Observations endorsed by IOTA

Yet another feather in AM’s cap.

Akashmitra Mandal (AM) has been observing stellar occultation events for last few years and have been submitting observations to International Occultation Timing Association (IOTA).

Following is the link related to this occultation event:

Last year, Akashmitra Mandal proposed Aryabhatta Research Institute of Observational Science (ARIES) to carry observation of rare stellar occultation by Dwarf planet Pluto using 1.2m and 3.6m telescopes at Devesthal Fast Optical Telescope (DFOT). After the successful observation of the event, data reduction was done and a paper on this collaborative work with scientists from premier institutes in India (like, PRL, IIST, IIA) and abroad is published in one of the most prestigious journals in the world, Astrophysical Journal Letters (ApJL).
Following is the link to full text paper:


https://doi.org/10.3847/2041-8213/ac4249

सोहो धूमकेतू

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी नासाने साेडलेला साेहाे उपग्रह सूर्याची छायाचित्रे टिपण्याचे काम सातत्याने करत असताे. सूर्याच्या जवळपासच्या परिसरात आलेल्या असंख्य गाेष्टी सुद्धा आपसूकच ह्या छायाचित्रांमध्ये दिसतात. ह्यामध्येच असतात सूर्याच्या अतिनिकट जाणारे धुमकेतू. ह्या धूमकेतूंना इंग्रजीत सनग्रेझिंग कॉमेटस् (Sun Grazing Comets) असे म्हटले जाते. 
सूर्याच्या अति जवळ गेल्यामुळे यातील बरेचसे धुमकेतू नष्टच हाेतात. अशा धुमकेतुंचा शाेध अनेकांनी नासाच्या साेहाे  उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रांवरून आत्तापर्यंत लावला आहे. छायाचित्रात  बिंदुवत दिसणारी वस्तू ही धुमकेतू आहे की आणखी काही हे ठरविण्यासाठी  अभ्यासकाचीच नजर हवी. साेहाे उपग्रहाच्या छायाचित्रांमधून शाेधलेल्या  धुमकेतूंना साेहाे धुमकेतू असेच म्हटले जाते. असे धुमकेतू जगभरातील अनेकांनी शाेधले. परंतु त्यात एकही भारतीय नव्हता. मात्र 8 डिसेंबर 2010 यादिवशी कल्याण येथील हाैशी खगाेल अभ्यासकांच्या आकाशमित्र मंडळ संस्थेचे अभ्यासू सभासद  शिशिर देशमुख यांनी शाेधलेल्या साेहाे उपग्रहाला मान्यता मिळाली व असा धुमकेतू शाेधणारे ते पहिले भारतीय ठरले. त्यानंतर त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन इतर काही भारतीयांनी आणखी   साेहाे धुमकेतू शाेधले. 
एका भारतीयाकडून पहिल्यांदा शाेधल्या गेलेल्या साेहाे धुमकेतूच्या शाेधाला आज दहा वर्षे पूर्ण झाली.त्यानिमित्ताने आकाशमित्र मंडळाच्या शिशिर देशमुख यांचे अभिनंदन.
-सुनिल 

पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर ह्यांना 83व्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आज 19 जुलै. पद्मविभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर ह्यांना 83व्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

केंब्रिज विद्यापीठाचे रँग्लर, स्थिरस्थिती सिद्धांतांचे प्रणेते, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित, पुण्यातील आयुका ह्या विख्यात विद्यापीठाचे संस्थापक अशी बहुविध  आेळख असणारे  डॉ. नारळीकर हे एक सुप्रसिद्ध विज्ञानलेखक देखील आहेत. 

समाजात व तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्याचे माेठे कार्य त्यांच्या लेखनातून साध्य झालेलं आहे.यक्षांची देणगी हा त्यांचा पहिला कथासंग्रह.

ह्यातील कथा वाचकांना वेगळ्याच विश्वात घेऊन गेल्या. गंगाधरपंतांचे पानिपत, उजव्या साेंडेचा गणपती, पुत्रवती भव, कृष्णविवर ह्या कथांमधलं विज्ञान समजायला खूपच साेपं हाेतं. नाैलखा हाराचे प्रकरण ही थेट ऑर्थर कॉनन डॉयलची आठवण करून देणारी शेरलॉक हाेम्स कथा ह्या पुस्तकाचा परमाेच्च बिंदू ठरेल. 

ह्या कथासंग्रहानंतर प्रकाशित झालेल्या त्यांच्या वामन परत न आला, प्रेषित, सूर्याचा प्रकाेप,व्हायरस ह्या कादंबऱ्या व कथासंग्रहांनी विज्ञान साहित्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. एलियन्स  किंवा स्टार वॉर्स असल्या विषयांपेक्षा नारळीकरांच्या कथांमधून मुलभूत विज्ञानातल्या संकल्पना लाेकांना आपसूक कळल्या. 

पूंजभाैतिकी (क्वांटम फिजिक्स), सापेक्षता (रिलेेटीव्हीटी)  ह्या आधुनिक भाैतिकशास्त्रातल्या संकल्पनांवर आधारीत कुठलीही क्लिष्टता न येता लिहीलेली कथा वाचल्यावर कथा ज्यावर आधारीत हाेती अशी एक्स्क्लूजन प्रिंसिंपल किंवा अनसर्टनटी ही  संकल्पना स्पष्ट करणारी कथेच्या शेवटी दिलेली  साेप्या भाषेतील तांत्रिक तळटीपसुद्धा वाचक तेवढ्याच तन्मयतेने वाचतात हे नारळीकरांमधल्या लेखकाचे माेठे यश आहे.

खगोलशास्त्राविषयी  समाजातील वाढते कुतूहल लक्षात घेऊन डॉ. जयंत नारळीकरांनी आकाशाशी जडले नाते हा ग्रंथ लिहीला. मुलभूत खगोलशास्त्राची ओळख करून देणारा हा ग्रंथ काेणीही वाचावा एवढ्या सुलभ मराठीत लिहीलेला आहे.

केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे साहित्य लिहून नारळीकर थांबले नाहीत तर हा दृष्टिकोन निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील पायरी ओलांडण्यासाठी आयुका ह्या खगोलशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठाची  स्थापना त्यांनी पुण्यात केली. 

पूर्वीच्या काळी आपल्याकडे असं हाेतं तसं हाेतं हे गप्पा मारण्यासाठी ठीक. पण आधुनिक काळात ते सिद्ध करता येत नसेल तर त्यापलीकडे त्याचा काहीच उपयाेग नाही. ही गाेष्ट वेळीच आवरली नाही तर राष्ट्राचे आधारस्तंभ असणाऱ्या तरूणांसमाेर भ्रमाचा पडदा उभा राहील. त्यापेक्षा विद्यमान काळातील विज्ञान व त्यातील संधी ह्याचा याेग्य परिचय झाला तर सध्याची तरूण पिढी वेळीच  याेग्य मार्गाकडे वळून देशाला खऱ्या अर्थाने जागतिक सन्मान मिळवून देईल. 

ह्यासाठी कुठलाही गाजावाजा न करता आपली जबाबदारी ओळखून प्रयत्न करणाऱ्या डॉ. जयंत नारळीकरांसारख्या विभूतींना विनम्र अभिवादन.

पद्मविभूषण ह्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या नागरी सन्मानाने विभूषीत डॉ. जयंत विष्णू नारळीकरांना  भारतरत्न हा सर्वाेच्च नागरी सन्मान लाभाे हीच सदिच्छा.

Sunil Vidwans

22 जुलै 2009 च्या खग्रास सूर्यग्रहणाची तपपूर्ती

आकाशमित्रच्या संस्मरणीय ग्रहण सहलीतील ही 2009 ची सूर्यग्रहण निरीक्षण सहल.

माेने सर व गाेखले सरांच्या पायलट ट्रीपनंतर जबलपूर हे ठिकाण नक्की झालं हाेतं.

नेहमीप्रमाणेच एक दिवस अंगावर ठेवून आकाशमित्र मंडळाचे सभासद व त्यांचे कुटुंबीय, स्नेही हे 20 जुलै 2009 च्या रात्री कल्याणहून रेल्वेने निघाले.

भर जुलै महिन्यात हे ग्रहण.त्यामुळे दिसण्याची शक्यता कमीच हाेती. परंतु खग्रास सूर्यग्रहणाचा थरार हा वेगळाच असताे. त्यामुळे ताे पहाण्यासाठी चान्स घ्यायला हरकत नव्हती. खग्रास ग्रहण बहुतेकांनी पाहीलेलं नसल्याने उत्सुकता खूपच हाेती. बराेबर अनुभवी मंडळी हाेती.त्यांच्याकडून ती वर्णनं ऐकून काहीतरी चमत्कार हाेऊन पावसाळ्यातील हे ग्रहण दिसावं हीच आस मनात बाळगून हाैशी अभ्यासकांचा ताफा मार्गस्थ झाला.

दुसऱ्या दिवशी 21 जुलैला जबलपूरला पाेहाेचल्यावर तिथलं संपूर्ण ढगाळ वातावरण व रिमझिमणारा पाऊस बघितल्यावर मनात शंकेच्या पाली चुकचुकायला लागल्या हाेत्या. परंतु उघड काेणीच बाेलत नव्हतं.

तिथल्या दत्तमंदिरात मुक्काम हाेता. दुपारी विश्रांतीनंतर काही जणांचा एक चमू ग्रहण निरीक्षणासाठीच्या जागेची पहाणी करायला निघाला. 

सकाळी  लवकर असलेली ग्रहणाची वेळ, पूर्व दिशा इ. गाेष्टींना धरून जबलपूरमधील काही मैदानं, माेकळ्या जागा, उंचावरील एक गढी इ. पाहून शेवटी गीता मंदिरा शेजारील माेकळ्या मैदानाची जागा मुक्रर झाली.

सायंकाळी जबलपूरमधील स्थानिक हाैशी मंडळींच्या एका सभेत माेने सर, गाेखले सर, शिशिर व अभय ह्या मान्यवरांनी बरीच माहीती दिली. शंकांचं निरसन केलं. याेग्य काळजी घेऊन हे ग्रहण पहावं असं आवाहनही केलं.

दुसऱ्या दिवशीचं हवामान, वातावरण ह्याबद्दल इंटरनेटवरून जाणून घेण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू हाेता. 

डाेळे मिटून पडल्यावर देखिल झाेप लागलेली मंडळी फारच कमी. 

22 जुलैची पहाट झाली. पहाटे चार वाजता बाहेर आकाश निरभ्र झालं हाेतं. चमकणारे तारे पाहून उत्साह संचारला.ग्रहण दिसू शकतं ही आशा बळावली. सगळेजण भराभर आवरायच्या मागे लागले.

सात वाजता बाहेर पडायच्या वेळेस मात्र चित्र पालटलं हाेतं. पहाटेचं निरभ्र आकाश आता संपूर्ण अभ्राच्छादित हाेतं. बसमधून मंडळी निघाली. ठरलेल्या ठिकाणाच्या एक कि.मी. आधीच पाेलीसांनी बस थांबवली. नर्मदेवर पवित्र स्नानासाठी जाणारी गर्दी आवरण्यासाठी वाहनांसाठी रस्ता बंद केला हाेता. इलाज नव्हता. सर्वजण पायी निघाले.

मैदानात पाेहाेचल्यावर ढगाळ हवामानाने सूर्गग्रहण दिसण्याची शक्यता पूर्ण  मावळली हाेती. वेळ झाली.  अचानक गाेखले सरांचा आवाज आला.पश्चिमेला ताेंड करा. आणि एक वेगळाच अनुभव आला. पश्चिमेकडून पूर्वेकडे झपाट्याने सरकणाऱ्या चंद्राच्या सावलीने  भर दिवसा रात्रीसारखा अंधार केला. आजूबाजूच्या घरातील दिवे लागले. 

हा अनुभव ग्रहणाएवढाच थरारक हाेता. 

ग्रहण नाही दिसलं पण हाही अनुभव कमी नव्हता.

आकाशमित्रच्या ग्रहण सहलींमधलं नियाेजन, काैटुंबिक वातावरण ज्येष्ठांचं मार्गदर्शन ह्यामुळे अशा सहलींना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळताे.

Astronomy Presentation Online Contest

It’s a proud moment for all the Akashmitras as we have recently conducted Astronomy Presentation Contest successfully🥳

For this competition, we received an overwhelming response from students of different parts of India including Kalyan, Thane, Mumbai, Pune, Nashik, Bengaluru, Delhi, Gujarat, Kerala. Participants were given 9 topics related to Astronomy on which they were supposed to make Power Point Presentations and email them to us. We received 24 such PPTs for first round. Out of them, 11 were shortlisted were the final round. In this round, participants presented their PPTs to us on June 20, 2021 based on which prizes were declared. Along with the 3 winners, 2 prizes were awarded in memory of Lt. Shri. Prabhakar Gokhale sir. Prize Declaration Ceremony was held on the same day for which Prof. N. M. Ashok sir was present as the chief guest!

-Vallari Kurdukar

मंगळाला चंद्राने आपल्यामागे लपविले

टलं तर खगोलशास्त्रीय दृष्टीने अगदी सामान्य गोष्ट – कोणतातरी तारा किंवा ग्रह चंद्रामागे लपणार आणि मग काहीवेळाने चांद्रबिंबामागून बाहेर पडणार. आकाशातील असे अनेक तारे चंद्रामागे रोज  जातात आणि मग बाहेर येतात. मात्र त्या ताऱ्यांच्या कमी तेजस्वीतेमुळे किंवा चांद्रबिंबाच्या अधिक तेजामुळे ते दखलपात्र नसतात. ताऱ्यांमध्ये रोहिणी तारका मात्र चंद्राच्या खास मर्जीतील आणि त्यामुळे तुलनेने त्यांची वरचेवर भेट होत असते. मात्र आज मंगळाला चंद्राने भर उजेडात, आपल्या कोणालाही कळू न देता आपल्यामागे लपविले – काही खट्याळपणा केला तर आईच्या पदरामागे लपणारे छोटे बाळच जणू ! मात्र लहान मुलाने कितीही ठरविलं तरी त्यांची चंचलवृत्ती त्यांना फार वेळ मागे लपूच देत नाही. तसाच हा आजचा मंगळ – २ तास मागे लपून बसला मात्र शेवटी ७:२१ ला त्याचाही संयम सुटलाच व त्याने डोकावून बघितले – चोर पकडला गेला. अन् अनेक आकाशप्रेमींनी त्याला बंदिस्त केले – काहींनी कॅमेऱ्यात, काहींनी डोळ्यात आणि मी…मनात 😊 ! 

(मंगळ, शनि वगैरे विनाकारण blacklist मधे गेलेल्या ग्रहांना सामान्य माणसांनी असं डोळे भरून पाहिलं की आम्हा आकाशमित्रांचं मन भरून येतं बुवा 😜😉! ) 

– अभिजित, पुणे 

– २७ सौर चैत्र १९४३ 

– १७ एप्रिल २०२१

श्री. गाेखले सर श्रद्धांजली सभा

आकाशमित्र मंडळाचे उपाध्यक्ष श्री.प्रभाकर गाेखले यांचे शुक्रवार दि.१९.०२.२०२१ राेजी दुःखद निधन झाले. श्री.गाेखले सरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आकाशमित्र मंडळाची सभा रविवार *दि.२१ फेब्रुवारी २०२१ राेजी दुपारी ४:३० वा.* खालील ठिकाणी  आयाेजित करण्यात आली आहे. 

  *आकाशमित्र मंडळाचे कल्याण महिला मंडळाच्या आवारातील वाचनालय  कल्याण (प).* 

*वि.सूचना* : *सभेला येताना मास्क लावणे आवश्यक  आहे.* 

 *सभा वेळेवर सुरू हाेण्यासाठी कृपया वेळेपूर्वी उपस्थित रहावे*

21/02/2021, 12:30 am – Amey Deshpande: गाेखले सरांची श्रद्धांजली सभा रविवार दि. २१ फेब्रुवारी २०२१ राेजी दु.४.३० वा. आयाेजित केली आहे. सद्यस्थितीत कराेनाचा वाढता धाेका लक्षात घेता आकाशमित्र मंडळाच्या वाचनालयात हाेणाऱ्या प्रत्यक्ष श्रद्धांजली सभेत याआधी सहभागी हाेण्याबद्दल कळविलेल्या माेजक्याच व्यक्तिंनी  उपस्थित रहावे  ही विनंती. 

परंतु गाेखले सरांविषयी बाेलण्याची/ऐकण्याची अनेकांची इच्छा लक्षात घेऊन हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन स्वरूपात देखिल आयाेजित केलेला आहे. कल्याण व परिसराच्या बाहेरून येणाऱ्यांनी ह्या सभेत ऑनलाईन सहभागी व्हावे ही विनंती. जेणेकरून अनेकांना एकाचवेळेस ह्या कार्यक्रमात सहभागी हाेऊन श्री.गाेखले सरांविषयीच्या भावना व्यक्त करता येतील. 

ह्या सभेत अनेकांची मनाेगतं व्यक्त करण्याची इच्छा असल्यामुळे  ज्यांना बाेलायचे आहे अशांनी आधी ग्रुपवर कळवावे. त्यामुळे ह्या सभेचे व्यवस्थित नियाेजन करता येईल. 

श्रद्धांजली सभेच्या कार्यक्रमात कृपया वेळेपूर्वी पाच ते दहा मि.सहभागी व्हावे.


Mrs. Mandalik

When we visit Aakashmitra for the first time..myself, my son Sahil n husband Amol..We were in trouble of getting   d Mahila Mandal Hall of Aakashmitra .. Sir was on phone with my husband continously, guiding d road.. And suddenly rain started heavily. 

We were on road looking here n there and then a old person came walking towards us holding an umbrella in his hand .. “Me Prabhakar Gokhale”  tumhala ghyayla aaloy..with a pleasant smile on his face in heavy rain n guttery roads..

“Sir Evdhya pawsaat tumhi ka aalat”

” Astronomy chi aawad asnara pratek student aamchya sathi mahatwacha aahe..mhanun me ghyayla aaloy “😊😊

Sirranni dilele he aapulaki che uttar ani tyanchi hasari mudra kayam smarnaat rahil..☺️❤️ GMRT ani Science exhibits madhe chhotya Sahil la tyanni khup confidence dila ..prem dile! aayushyat Siransarkhi vyakti bhetli he maze ani sahil che bhagya aahe🙏


20/02/2021, 6:43 pm – Sunil Vidwans: साै. मंडलिक तुमचा हा अनुभव नि:शब्द करणारा आहे. साहिल प्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी प्रोत्साहन दिले. आपुलकी दिली आणि आकाशमित्र परिवाराशी घट्ट बांधून घेतले. कृष्णविवराच्या अफाट गुरूत्वीय बलापेक्षाही गाेखले सरांचे  आकाशमित्र विषयी विद्यार्थ्यांच्या मनात जिव्हाळा निर्माण हे प्रोत्साहनाचे बल ताकदवान हाेते. ह्या दाेन्ही बलांतला फरक हा हाेता की कृष्णविवरात शिरलेल्या प्रत्येक वस्तूची घडण गुरूत्वीय बलाच्या प्रभावामुळे नष्ट हाेते, उध्वस्त हाेते तर आकाशमित्रच्या गाेखले नामक गुरूंच्या गुरूबलामुळे इथल्या प्रत्येकाची आणखी चांगली घडण हाेत गेली.  परिपूर्ण हाेत गेली.

सरांचे प्रोत्साहनाचे हे बल विश्वातील मुलभूत बलांपेक्षा फार वेगळे आहे. गाेखले सर आज आपल्यात नसले तरी हे उत्साहाचे बल त्यांनी कायमस्वरूपी निर्माण करून ठेवलेय. त्याच्या प्रभावक्षेत्रात शिरलेला प्रत्येकजण कायमचा भारलेला राहील. गाेखले सरांनी आपल्या सर्वांसाठी मागे ठेवलेल्या ह्या अदभूत वारश्याचे वारस ठरण्याचा आपण सर्वजण मनापासून प्रयत्न करूया हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.

सरांना शतश: नमन 🙏🏻


जणू ध्रुवतारा निखळला हरवली आमची दिशा 

मार्ग आमचा भरकटला

अरे पण प्रृथ्वीचती

जी डगमगते लुटपुटते

आपला अक्ष साडून

रोख आपला बदलते

रहा दक्ष, कर आपल्या विचांराकडे लक्ष

स्थिरकर मनाचा अक्ष

बघ तो ध्रुवतारा, तिथेच स्थिर, अचल, अभेद्य

काल, आज आणि उद्यापण

गोखले सर आणि सर्व आकाशमित्रांना समर्पित…

– Shridhar Pophali
  • Shridhar Pophali

आकाशमित्र मधील सर्वात तरुण मित्र

आज १९ फेब्रुवारी २०२१, संध्याकाळी आकाशमित्र मंडळाचा प्रभाकर खऱ्या प्रभाकराच्या बरोबर अस्ताला गेला. संस्थेचा आजपर्यंतच्या प्रवासातील सर्वात दुःखद दिवस !

सर्वांचे लाडके आणि वंदनीय असे “गोखले सर” आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच करवत नाहीये.

एक अखंड उत्साहाचा झरा जणू आटला. आकाशमित्रचा कोणताही कार्यक्रम असो, गोखले सरांचा त्यातील उत्साही सहभाग हा उल्लेखनीय असायचा. सरांचे वर्णन एकाच लेखात करणे केवळ अशक्य आहे. 

आकाशमित्रांपैकी कोणीही काही सादर केले की त्या सादरीकरणावर, त्या व्यक्तीला उत्साहित करणारी, प्रेरणा देणारी पहिली प्रतिक्रिया नेहमी गोखले सरांचीच असायची. रविवारच्या meetings (भेटींमध्ये) मध्ये सर्वात सातत्याने, न चुकता येणारे फक्त गोखले सरच होते ह्यात दुमत होणार नाही.

आकाशदर्शनाचा कार्यक्रम म्हणजे तर गोखले सरांचाच म्हणावा लागेल. खगोलशास्त्रासंबंधी सर्वांना माहिती देणे असो किंवा मामणोली आश्रमाबद्दल माहिती देणे असो, सर सर्वात पुढे असायचे. आणि सरांचा सावल्यांचा खेळ आणि जादूचे  प्रयोग बघताना कार्यक्रमाला आलेले सारे आबालवृद्ध अगदी रंगून जायचे. आम्ही सर्व तो खेळ इतक्या वेळा पाहून सुद्धा परत परत प्रत्येक वेळेस बघायचो आणि तितकाच एन्जॉयही करायचो. लोकांना रंगवून ठेवण्यात तर सरांचा हात कोणी धरू शकणार नाही.

रविवारच्या meetings (भेटींमध्ये) मध्ये नेहमी काहीतरी चांगला विषय मांडून किंवा एखादा विचार करायला लावणारा प्रश्न  उपस्थित करून ते सुरवात करायचे म्हणून केवळ बरेच रविवार खगोलशास्त्र विषयावर विचार मंथन घडायचे नाहीतर रविवारच्या  मीटिंगस (भेटी) बंदच झाल्या असत्या. ते श्रेय सुध्दा गोखले सरांनाच.  

Astronomical models करावी तर त्यांनीच. मॉडेल करण्यासाठी आधी त्याची  concept नीट समजून घ्यायची, मग त्याचे एक drawing करायचे. ते तयार करण्यासाठी मनोज सर,  गोविंदराज सर, निलेश यांची मदत घेऊन ते  पूर्ण करणे, येणाऱ्या practical difficulties ना हसत हसत  सामोरे जाऊन त्यावर मात करणे हे सर्व गोखले सरच करू जाणे. आकाशमित्रचा GMRT च्या प्रदर्शनातील दर वर्षीचा सहभाग केवळ गोखले सरांमुळेच झाला. 

गोखले सरांमुळे आकाशमित्र संस्थेचा जनसंपर्क देखील खूप वाढला.  एक परिपक्व व्यक्तिमत्व म्हणून, आणि संस्थेचे उपाध्यक्ष आणि संस्थेचा  आधारस्तंभ ह्या नात्याने सरांचा अधिकार फारच मोठा होता. सरांच्या जाण्याने एक फार मोठी पोकळी संस्थेत निर्माण झाली आहे ती भरून निघणे केवळ  अशक्य. 

सरांचा देह पंचतत्वात विलीन झाला तेव्हा आकाश देखील आपले अश्रू आवरू शकले नाही. 

त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!!

-अभय पुराणिक

Tribute to Padma Bhushan Dr. Shashikumar Madhusudan Chitre

Akashmitra Mandal, Kalyan has organized an online session on Sunday 17th January 2021 between  3.45 pm to 5.45 pm to pay *Tribute to eminent Astrophysicist &  Mathematician  Padma Bhushan Dr. Shashikumar Madhusudan Chitre.* 
Along with amateur astronomers, this online session will also be joined by 
well known scientist / Padma Vibhushan Dr. Jayant Narlikar
Mrs. Mangala Narlikar. 
Followed by, Shri.Hemant Mone, President, Akashmitra Mandal, Kalyan 
Prof. N.M.Ashok, Sr.Scientist, Physical Research Laboratory (PRL) And others...

चंद्र-गुरू-शनि युती गुरूवार 17 डिसेंबर 2020

चंद्र-गुरू-शनि युती गुरूवार 17 डिसेंबर 2020 - दि. 21 डिसेंबर 2020 राेजी हाेणाऱ्या गुरू व शनिच्या युतीबद्दल आपण सध्या सर्वत्र वाचताेय. ह्याच युती संदर्भातील आणखी एक प्रेक्षणीय दृश्य ठरू शकतं ते 17 डिसेंबर 2020 ह्या दिवशी. कार्तिक अमावास्येनंतर सुरू झालेल्या मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध तृतीयेची चंद्रकाेर गुरूवार 17 डिसेंबरला पश्चिम आकाशात सायंकाळी साडेसहा नंतर शनि व गुरू ह्यांच्याजवळ बघता येईल. चंद्रकाेर व त्याच्या उजव्या हाताला म्हणजेच उत्तरेला असणारा तेजस्वी गुरू नक्कीच आेळखू येतील. गुरूच्या निकट असलेला थाेडासा कमी तेजस्वी शनि देखिल त्यामुळे कळेल. 

त्यानंतर दरराेज चंद्र  पूर्वेकडे व ह्या दाेन्ही ग्रहांपासून लांब जाऊ लागेल.  21 डिसेंबरला चंद्रकाेर बरीच लांब पूर्वेकडे सरकलेली असेल. परंतु 17 डिसेंबरला चंद्राने ह्या दाेन्ही ग्रहांची ओळख आपल्याला करून दिलेली असल्याने 21 डिसेंबरला ते ओळखणे आपल्याला नक्कीच साेपे जाईल. चंद्रकाेर व गुरू-शनि हे विलाेभनीय दृश्य 17 डिसेंबर 2020 या दिवशी नक्की पहा. 

21 तारखेला ह्या दाेन्ही ग्रहांमध्ये एक अंशापेक्षा कमी अंतर असेल. त्या दिवशी ते ओळखू यावेत यासाठी आणि 17 डिसेंबर नंतर 21 तारखेपर्यंत गुरू व शनि कसे जवळ आले ते कळण्यासाठी  17 डिसेंबरच्या चंद्र-गुरू-शनि युतीपासूनच निरीक्षण करणं नक्कीच उत्कंठावर्धक ठरेल