अधिक महिना : एक खगोलशास्त्रीय दृष्टिकोन

आकाशमित्र मंडळाच्या उद्या रविवार दि.11.6.2023 राेजी सायं.5 वा. हाेणाऱ्या साप्ताहिक बैठकीचा विषय आहे,
अधिक महिना : एक खगोलशास्त्रीय दृष्टिकोन
वक्ते: श्री.अभय पुराणिक

मराठी महिन्यांच्या दिनदर्शिकेत ह्यावर्षी एक महिना अधिक म्हणजेच जास्तीचा दाखवलेला आहे. ह्या अधिक आलेल्या महिन्यामुळे आपले सणवार इंग्रजी दिनदर्शिकेतील तारखांचा विचार केला तर मागील वर्षीच्या तुलनेत काही दिवस पुढे सरकलेले दिसतील.
अधिक आलेल्या महिन्याचा हा एक परिणाम झाला.

 • अशा इतर काेणत्या गाेष्टींवर अधिक महिन्याचा परिणाम हाेताे.?
 • मुळात अधिक महिना का घ्यावा लागताे?
 • ताे दरवर्षी येताे की काही वर्षांनी येताे?
 • मराठी महिन्यांपैकी काेणताही महिना अधिक येताे की त्याचे काही नियम आहेत?
 • अधिक महिना आलाच नाही तर काय हाेईल?
 • अधिक महिना येताे तसा कुठल्या वर्षी एखादा महिना कमी येऊ शकेल का?
  इ. अनेक शंका जाणकारांच्या मनात येत असतील.
  ह्या व अशा प्रश्नांची पूर्णपणे शास्त्रीय दृष्टिकोनातून उत्तरे मिळविण्यासाठी उद्या रविवारी हाेणाऱ्या विशेष व्याख्यानाला जरूर उपस्थित रहा. दि. 11 जून 23 सायं 5 वा
  ठिकाण: गजानन विद्यालय, स्वामी नारायण मंदिराशेजारी, शंकरराव चाैक, कल्याण(प.)