मुख वक्ते: श्री.हेमंत मोने व श्री.विद्येश कुलकर्णी.
दरवर्षी मे महिन्यात घडणारी खगोलशास्त्रीय घटना म्हणजे शून्यसावलीचा दिवस अर्थात Zero Shadow Day
ही घटना ठराविक दिवसांतच का अनुभवता येते? शून्यसावली म्हणजेच आपली सावली न दिसणे ही घटना दिवसभर सुरू असते का? ही घटना सगळ्या शहरांमध्ये एकाच दिवशी घडते की वेगवेगळ्या दिवशी? ह्यामागे काय कारण आहे?
शून्यसावली ह्या घटनेचे शास्त्रीय निरीक्षण कसे करावे?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आकाशमित्र मंडळ आयोजित शून्यसावलीची वारी ह्या खगोलशास्त्रीय व्याख्यानाला जरूर उपस्थित रहा. सर्व खगोलप्रेमींसाठी हे व्याख्यान खुले आहे. कृपया ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा.