रविवारीय साप्ताहिक सभा दि 06.04.25

आकाशमित्र मंडळाची रविवारीय साप्ताहिक सभा उद्या रविवार दि 06.04.25 रोजी दु.4.30 वा. गजानन विद्यालय येथे नेहमीप्रमाणे होईल.

शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असलेला खगोलशास्त्र हा विषय, त्यातील संकल्पना इ. विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजाविण्यासाठी आकाशमित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. शाळांना भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्याने सादर करण्यास आकाशमित्रने सुरूवात केली आहे.
जून महिन्यापासून सुरू होणा-या नवीन शैक्षणिक वर्षात वरील कार्यक्रम आणखी
परिणामकारकपणे कसा राबविता येईल ह्याबाबत प्रत्येकाने आपापल्या
कल्पना उद्याच्या सभेत जरूर मांडाव्यात.
त्याचप्रमाणे ह्यावर्षीचा खगोल अभ्यासवर्ग कसा/कधी घ्यावा इ.बाबत देखिल उद्याच्या सभेत चर्चा होईल.
आकाशमित्रमधील विद्यार्थी सभासद व त्यांच्या पालकांनी खगोलशास्त्र विषयाबाबतच्या त्यांच्या अपेक्षा व सूचना मांडण्यासाठी उद्याच्या सभेला जरूर उपस्थित रहावे.

कृपया सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती