रविवारीय साप्ताहिक सभा दि. २५-०५-२५

आकाशमित्र मंडळ रविवारीय साप्ताहिक सभा उद्या दि. २५-०५-२५रोजी दु. ४.३० वा. ठिकाण : गजानन विद्यालय

विख्यात खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण श्री. जयंत नारळीकर ह्यांचे नुकतेच निधन झाले.

विश्वनिर्मितीच्या स्थिरस्थिती सिद्धांताचे प्रणेते, आयुकाचे संस्थापक, अनेक पुरस्कारांनी सन्मानित,
विज्ञानविषयक सोप्या भाषेत लिहिणारे लेखक इ. अनेकविध स्वरूपाची ओळख असणाऱ्या श्री.नारळीकरांना उद्याच्या सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल.

आकाशमित्राचा श्री. नारळीकरांशी अनेक वेळा संपर्क आला होता. आकाशमित्रच्या स्थापनेपासूनच ते आकाशमित्रशी परिचित होते. त्यामुळे काही आकाशमित्रांकडून त्यांच्याविषयीच्या आठवणी ऐकायला मिळतील. 

कोणाला त्यांच्या कार्याविषयी , संशोधनाविषयी बोलावयाचे असल्यास वेळेची मर्यादा पाळून बोलता येईल.

तरी सर्व खगोलप्रेमींनी उद्याच्या सभेसाठी जरूर उपस्थित रहावे.

आज कल्याणकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस’

आज कल्याणकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस’

सुभेदार कट्टा आणि आकाशमित्र मंडळ तर्फे कल्याण येथील सुभाष मैदानात शून्य सावली दिवस अनुभवला.
आज कल्याणकरांनी अनुभवला ‘शुन्य सावली दिवस’. माध्यांनिचा सुर्य डोक्यावर आला असताना ही स्थिती वर्षातुन दोनदा येते,दुपारी १२.३५ वाजल्या नंतर ….प्रत्यक्षपणे ही घटना आज उपस्थित खगोल प्रेमीनी सुभाष मैदानात अनुभवली,
आकाशमिञ संस्थेतर्फे श्री.विद्येश कुलकर्णी सरांनी ही खगोलीय घटना कां घडते हे विषद केले.
आकाशमिञचे श्री.संजय भाटे,श्री.संजय पांडे यांनी चर्चेत सहभाग घेतला,श्री.आर्चित गोखले हे मुलुंडहुन आले होते.
सुभेदार वाडा कट्ट्या तर्फे श्री.दिपक जोशी श्री.आमोद काटदरे ,ज्येष्ठ नागरिक संघाकडुन श्री.माधव नेने,सामाजिक कार्यकर्त्या सौ.विद्या धारप व त्यांचे विद्यार्थी आले होते.
ह्या भौगोलिक घटनेला जाणकार कल्याणकरांनी व विद्यार्थ्यानी चांगली उयस्थिती नोंदवली.

साप्ताहिक सभा दि. 18.5.25

आकाशमित्र मंडळ व सुभेदारवाडा कट्टा ह्याच्यातर्फे पार पडलेल्या कालच्या शून्य सावली दिवसाच्या प्रात्यक्षिकांबद्दलची अधिक माहिती आज दिली जाईल.

त्याचप्रमाणे श्री.निखिल गेडाम ह्यांच्या खगोलशास्त्रीय प्रश्नावलीतील काही प्रश्नांबाबत चर्चा आज होणार आहे.

तरी कृपया जास्तीत जास्त खगोलप्रेमींनी आजच्या सभेस वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती

शून्यसावलीची वारी रविवार दि.11.5.2025

मुख वक्ते: श्री.हेमंत मोने व श्री.विद्येश कुलकर्णी.

दरवर्षी मे महिन्यात घडणारी खगोलशास्त्रीय घटना म्हणजे शून्यसावलीचा दिवस अर्थात Zero Shadow Day
ही घटना ठराविक दिवसांतच का अनुभवता येते? शून्यसावली म्हणजेच आपली सावली न दिसणे ही घटना दिवसभर सुरू असते का? ही घटना सगळ्या शहरांमध्ये एकाच दिवशी घडते की वेगवेगळ्या दिवशी? ह्यामागे काय कारण आहे?
शून्यसावली ह्या घटनेचे शास्त्रीय निरीक्षण कसे करावे?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आकाशमित्र मंडळ आयोजित शून्यसावलीची वारी ह्या खगोलशास्त्रीय व्याख्यानाला जरूर उपस्थित रहा. सर्व खगोलप्रेमींसाठी हे व्याख्यान खुले आहे. कृपया ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा.

रविवारीय साप्ताहिक सभा दि 04.05.25

उद्याच्या सभेत श्री.अभय पुराणिक सर Celestial Co-ordinate system Part II (खगोलीय सहनिर्देशांक-2)
ह्या महत्वाच्या विषयावर बोलणार आहेत.
आकाशातील ता-यांच्या निरिक्षणाच्या दृष्टीने वरील विषय महत्वाचा आहे.

कृपया उद्या येताना ता-यांचे नकाशे (star maps) ज्यांच्याकडे असतील त्यांनी ते घेऊन यावेत ही विनंती.

उद्याच्या सभेला सर्वांनी दु.4.30 पूर्वी उपस्थित रहावे ही विनंती

रविवारीय साप्ताहिक सभा दि 20.04.25

आकाशमित्र मंडळाची रविवारीय साप्ताहिक सभा उद्या रविवार दि 20.04.25 रोजी दु.4.30 वा. गजानन विद्यालय येथे नेहमीप्रमाणे होईल.

उद्याच्या सभेचा विषय Brainstorming in Astronnomy अर्थात
खगोलशास्त्रातील महत्वाच्या विषयांवर विचारमंथन.

उद्याच्या सभेला सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती

रविवारीय साप्ताहिक सभा दि 13.04.25

आकाशमित्र मंडळाची रविवारीय साप्ताहिक सभा उद्या रविवार दि 13.04.25 रोजी दु.4.30 वा. गजानन विद्यालय येथे नेहमीप्रमाणे होईल.

उद्याच्या सभेत श्री.अभय पुराणिक सर Celestial Co-ordinate system खगोलीय सहनिर्देशांक
ह्या अत्य॔त महत्वाच्या विषयावर बोलणार आहेत.
आकाशातील ता-यांच्या निरिक्षणाच्या दृष्टीने वरील विषय महत्वाचा आहे.

अभय सर त्यांच्या नेहमीच्या शैलीत हा विषय सोपा करून सर्वांसमोर मांडतील ह्यात शंका नाही.

कृपया उद्या येताना ता-यांचे नकाशे (star maps) ज्यांच्याकडे असतील त्यांनी ते घेऊन यावेत ही विनंती.

उद्याच्या सभेला सर्वांनी वेळेवर जरूर उपस्थित रहावे ही विनंती

रविवारीय साप्ताहिक सभा दि 06.04.25

आकाशमित्र मंडळाची रविवारीय साप्ताहिक सभा उद्या रविवार दि 06.04.25 रोजी दु.4.30 वा. गजानन विद्यालय येथे नेहमीप्रमाणे होईल.

शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असलेला खगोलशास्त्र हा विषय, त्यातील संकल्पना इ. विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजाविण्यासाठी आकाशमित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. शाळांना भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्याने सादर करण्यास आकाशमित्रने सुरूवात केली आहे.
जून महिन्यापासून सुरू होणा-या नवीन शैक्षणिक वर्षात वरील कार्यक्रम आणखी
परिणामकारकपणे कसा राबविता येईल ह्याबाबत प्रत्येकाने आपापल्या
कल्पना उद्याच्या सभेत जरूर मांडाव्यात.
त्याचप्रमाणे ह्यावर्षीचा खगोल अभ्यासवर्ग कसा/कधी घ्यावा इ.बाबत देखिल उद्याच्या सभेत चर्चा होईल.
आकाशमित्रमधील विद्यार्थी सभासद व त्यांच्या पालकांनी खगोलशास्त्र विषयाबाबतच्या त्यांच्या अपेक्षा व सूचना मांडण्यासाठी उद्याच्या सभेला जरूर उपस्थित रहावे.

कृपया सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती

रविवारीय साप्ताहिक सभा दि 30.03.25

आकाशमित्र मंडळाची रविवारीय साप्ताहिक सभा उद्या रविवार दि 30.03.25 रोजी दु.4.30 वा. गजानन विद्यालय येथे नेहमीप्रमाणे होईल.

पुणे येथे संपन्न झालेल्या खगोलशास्त्र प्रशिक्षण शिबिरात आकाशमित्रांनी सहभागींना दिलेल्या प्रशिक्षणाबाबतचा सविस्तर वृतांत ह्या बैठकीत सर्वांसमोर सादर होईल.

तरी कृपया सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती

प्राथमिक खगाेल अभ्यासवर्ग

आकाशमित्र मंडळाचा प्राथमिक खगाेल अभ्यासवर्ग आज सुरू हाेत आहे.

ठिकाण : गजानन विद्यालय , स्वामी नारायण मंदिराशेजारी, शंकरराव चाैक, कल्याण (प).

वेळ: सायंकाळी 4.30 ते 6.30

हे वर्ग पुढील 16 रविवार सायंकाळी 4.30 ते 6.30 ह्या वेळात वरील ठिकाणी भरतील.

खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या मुलभूत संकल्पना ह्या अभ्यासक्रमात शिकविल्या जातील.

आजचे शुभारंभाचे व्याख्यान सुप्रसिद्ध खगाेलअभ्यासक श्री.दा.कृ.साेमण हे घेणार आहेत.