हान्ले म्हटले की समोर येते ती २-मीटरची हान्ले चंद्रा optical टेलिस्कोप. हान्ले भेटी मध्ये ही दुर्बिण पहिल्यान्दा बघायचा योग आला. अर्थात, दुर्बिणीचा बाह्यभाग आणि तत्सम उपकरणे हौशी लोकांना बघता येतात. दुर्बिणीने घेतलेले photos आणि controlling हे IIA, बंगलोर येथून केले जाते.
4500 मीटर वर पृथ्वीच्या वातावरण्याच्या जाडीच्या बरोबर मधे असलेल्या हान्ले मधे अजुन एक टेलिस्काप ताठ मानेने उभी राहिलेली आहे, ती म्हणजे BARC ची Major Atmospheric Cherenkov Experiment (MACE) Gamma Ray Telescope. कदाचित, माझ्यासारख्या occasional हौशी अभ्यासकासाठी हे आश्चर्यच होत. अजून एक आश्चर्य म्हणजे, ह्या टेलिस्कोपवर काम करणाऱ्या आकाशमित्र सागर गोडांबे ह्याची हान्ले येथे प्रत्यक्ष भेट.
सागरची भेट पर्वणीच ठरली, त्यामुळे आम्हाला दुर्बिणी बद्दल माहिती, त्याची बांधणी आणि control center हे प्रत्यक्ष बघता आले.
BARC MACE बद्दल थोडेसे.
- ही 21-मीटर ची दुर्बिण आकाराने जगातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी GRT आहे. पण एवढ्या उंचीवर जगतील एकमेव GRT आहे.
- अभिमानाची गोष्ट म्हणजे दुर्बिणी पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाने बनविली आहे.
- दुर्बिणीचा primary mirror हा honey comb पद्धतीने बनविला आहे. 1m x 1m पॅनलवर 50cm चे 4 आरसे अश्या प्रकारे 356 पॅनेल्स बसविण्यात आले आहेत.
- दुर्बिणीचा focal point नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक आरश्यामागे 3 actuators बसविण्यात आले आहेत.
- Focal plane च्या जागी 1088 Photomultiplier tubes (PMT) ने बनलेला कॅमेरा बसविण्यात आल्या आहे. GRT अप्रत्यक्षपणे gamma rays चे अस्तित्व शोधते. PMT चे काम म्हणजे, gamma rays मुळे बनलेले सुक्ष्म असे चमकदार प्रकाश बिंदु शोधणे
- PMT ने पकडलेले signals हे जवळच्याच control room मधे process केले जातात आणि सॅाफ्टवेअर gamma rays मुळे बनलेल्या data चे विलगीकरण करते.
सध्या ह्या दुर्बिणीची रंगीत तालिम चालु आहे आणि लवकरच ती अधिकृतपणे operational केली जाईल.
तर, हीच ती हान्ले मधील ‘न’-सांगितलेली दुर्बिण.
सागर गोडंबे (Sagar Godambe)आणि त्याचे सहकारी स्टाझीन नोर्लाह (Twitter handle: @snorl)ह्यांचे आभार, त्यांच्यशिवाय ही दुर्बिण माझ्या साठी एक रहस्यच राहिली असती.
…श्रीधर पोफळी